Pune : Shaniwar Wada च्या मुख्य दरवाजाजवळचा दर्गा हटवा, ब्राह्मण महासंघाची मागणी
प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर आता शनिवार वाड्यातील दर्ग्यावरून वादाची शक्यता निर्माण झालेय. शनिवारवाडा प्रांगणात मुख्य दरवाजाजवळचा दर्गा हटवण्याची ब्राह्मण महासंघाकडून मागणी करण्यात आली आहे. तसंच हे बांधकाम सुमारे ३० वर्षापूर्वीचं असल्याचं सांगत, त्याला ऐतिहासिक पुरावे नसल्याचा दावा ब्राह्मण महासंघानं केलाय.