Pune Rains | पुण्यातील सिंहगड रस्त्याला नदीचं स्वरुप, रात्रभराच्या पावसामुळे रस्ता पाण्याखाली

पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे.  पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली. या पावसामुळे सिंहगड रस्त्याला नदीचं स्वरुप आलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola