Pune Rains | पुण्यात रात्रभर पावसाचं धुमशान, शनिवारवाडा परिसरातील वाहनांचं नुकसान
: पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.