Pune Rains : पुण्यात रात्रभर तुफान पाऊस, शहरात अनेक भागात साचलं पाणी

Continues below advertisement

Pune Rains : पुण्यात रात्रभर तुफान पाऊस, शहरात अनेक भागात साचलं पाणी 

पुण्यात रात्रभर पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. सिंहगड रोडवरील ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. त्यात किमान २०० लोक अडकले होते. त्याचबरोबर अनेक वस्त्यांमध्येही घरात पाणी शिरलंय. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलंय. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झालाय. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram