Pune : पुण्यातील 500 कोटींची जागा 60 कोटींमध्ये बिल्डरला देण्याचा डाव

Continues below advertisement

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या समोर असलेली आणि कर्क रोगाच्या रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनकी बांधकाम विभागाच्या मालकीची पाचशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीची सव्वा दोन एकर जागा अवघ्या साठ कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आलाय . सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः याला विरोध केला असून जागेच्या बदल्यात मिळणार असलेले साठ कोटी रुपये स्वतः देण्याची तयारी दर्शवलीय . विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं असून त्यापैकी एका कार्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं स्मारक असून विश्वेश्वरय्या त्यांच्या हयातीत पुण्यात असताना इथून त्यांचं कामकाज पाहायचे . मात्र एन जी व्हेंचर्स या खाजगी बिल्डरला ही जागा द्यायचं रस्ते विकास महामंडळाने ठरवलंय . सार्वजनिक बांधकाम विभागाची ही सव्वा दोन एकर जागा २६ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला भाडेतत्वार देण्यात आली होती . मात्र या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाची  अनके कार्यालयं अनेक वर्षांपासून काम करत असून उरलेल्या जागेत  कॅन्सर रुग्णांसाठीचा स्वतंत्र विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे . मात्र शेकडो कोटी रुपयांची ही जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा हा डाव आहे . याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असता आपल्याला याबाबत काही माहितीच नसल्याचं उत्तर त्यांनी दिलंय तर रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे या अभियंत्यांना अद्याप भेटलेलेलच नाहीत . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram