Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक!

Continues below advertisement

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन  मुलाच्या आईला अटक!

कल्याणीनगर अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला क्राईम ब्रांचनं केली अटक
-----
शिवानी अगरवाल यांना पोलिसांनी केली अटक
-----
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस (Pune Police) आता अल्पवयीन मुलाची चौकशी (Enquiry) करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून (Juvenile Justice Board) अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध नसल्याने बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत गुन्हे शाखेकडून ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच उद्या अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडलं होतं. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram