Pune Porsche Car Accident Reaction : वास्तव भाग 32 : अपघातानंतर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

 पुणे :  पुण्यात (Pune Porsche Car Accident News)  प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं.  पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.   पुण्यात रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता  या प्रकरणाची कठोर चौकशी करण्यचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चोपले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश दिले आहेत.  देवेंद्र फडणवीस यांनी  पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन आदेश दिले.  या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना  दिल्या  आहेत.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola