Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालवर आणखी एक गुन्हा दाखल होणार

Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालला पुणे पोलीस पुन्हा अटक करणार आहेत. ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकावल्याच्या प्रकरणात नवीन गुन्हा दाखल करुन अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयात विशालला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयाने प्रोडक्शन वॉरंट सबमिट केलेलं आहे. न्यायालयाने याला संमती देताच, विशालला ड्रायव्हर प्रकरणात अटक केली जाईल. 

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.  आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola