PM Modi यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, 1 हजार जिवंत काडतुसं जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहिम राबवली.. धक्कादायक बाब म्हणजे यात पोलिसांच्या हाती 1 हजार जिवंत काडतुसं हाती लागली आहेत... पुण्याच्या पर्वती भागातील एका भंगार व्यापाऱ्याकडून 1 हजार 105 काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी 3500 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतलीय.. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पथकानं बेकायदा पुस्तुल बाळगल्याप्रकरणी तिंघाना अटक केलीय.. या आरोपींकडून शेकडो खराब काडतुसंं जप्त केली आहेत... तसंच कोयते बाळगल्याप्रकरणी 29 जणांना अटक केलीय..