Pune Police Reward List : पुणे पोलिसांची वादग्रस्त रिवॉर्ड यादी व्हायरल

पुणे पोलिसांकडून दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षिसं दिली जातात. पण ही यादी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील आरोपींना अटक करणाऱ्या, विविध गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त शंभर रुपये बक्षीस देण्यात आलं आहे. तर वरिष्ठांना घरून पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन वरून पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना  21 हजार रुपयांचं बक्षीस पोलीस उप आयुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बक्षिसाची यादी पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola