Pune : पाण्याच्या प्रवाशी खेळणं महागात पडलं,पाण्यात मस्ती करताना तरुण वाहून गेला : ABP Majha

मावळच्या कुंडमळा इथं वर्षाविहारासाठी आलेल्या एका तरुणाला पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं महागात पडलं. पाण्यात मस्ती करताना हा तरुण वाहून गेला. मूळचा गोव्याचा असलेला वैभव देसाई पिंपरी चिंचवडमध्ये राहात होता. कुंडमळा इथं वर्षाविहारासाठी आला असताना तो पाण्यात उतरला. प्रवाही पाण्यात मस्ती करत असताना तो काही वेळातच वाहून गेला. प्रवाही पाण्यात केलेलं नसतं धाडस त्याला महागात पडलं. ही दुर्घटना घडण्याआधी हा तरुण पाण्यात मस्ती करत असतानाचा व्हीडिओ समोर आलाय. या व्हीडिओत लाल शर्ट घातलेला हा तरुण नंतर वाहून गेला.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola