Ajit Pawar | गुंडांचा नायनाट करा, जनतेला दिलासा द्या; अजित पवारांचा पोलिसांना सल्ला

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी मोठी पोलीस भरती करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरु झालेल्याचं सांगितलं. त्यासाठी एसी-बीसी उमेदवारांना गृहखात्याकडून दिलासा देण्याचं काम होतंय, असंही सांगितलं. तसेच यावेळी बोलताना गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो, अशा सूचनाही अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत.