पहिल्याच दिवशी Pimpri Chinchwad जम्बो हॉस्पिटलमधील एसीची सुविधा ठप्प; 100 हून अधिक रुग्णांची गैरसोय
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एसीची सुविधा जम्बो कोविड सेंटर सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. 100 हून अधिक रुग्णांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्याची मागणी केली जात आहे. ऐन उन्हाळ्यात एसीची सेवा ठप्प झाली आहे. तसेच ही सेवा पूर्ववत करण्यासाठी 72 तासांचा अवधी लागणार आहे.