Pune PFI School : कोंढवा परिसरातील पीएफआयच्या शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण
Pune PFI School : शिक्षणाचं माहेर घर असलेल्या (Pune PFI School) पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील पीएफआयच्या (PFI) एका शाळेत विद्यार्थ्यांना रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा आरोप NIAने केला आहे. त्यांच्या आरोपपत्रात हा आरोप करण्यात आला आहे. ब्लू बेल हायस्कूल या शाळेच्या इमारतीत असलेल्या चौथ्या मजल्यावर हा प्रकार सुरु होता. या घडत असलेल्या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.