Pune Nude Photography : पुण्यात न्युड फोटो प्रदर्शनावरून वाद, बालगंधर्व रंगमंदिरातील एक्झिबीशन बंद

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित फोटो एक्झीबीशनमधे न्युडीटी अर्थात नग्णतेच्या थीमवर आधारित छायाचित्रे लावण्यात आल्याने हे फोटो एक्झीबीशन बंद करण्याचा निर्णय बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापनाने घेतला.  अक्षय माळी या तरुण छायाचित्रकाराने हे फोटो एक्झीबीशन आयोजित केले होते.  या एक्झीबीशनमधे अक्षयने स्वतःचे आणि इतर मॉडेल्सचे नग्न फोटो मांडले. पण बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापनाकडे याबाबत काही नागरिकांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाने हे फोटो काढून टाकण्यास सांगण्यात अक्षय माळीला सांगितले.  शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस हे फोटो एक्झीबीशन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते पण पहिल्याच दिवशी अक्षय माळीला हे एक्झीबीशन बंद करावे लागले.  या फोटो एक्झीबीशनची थीम न्युडीटी आहे असे अक्षयने परवानगी घेताना सांगितले नव्हते,  फक्त फोटो एक्झीबीशन आयोजित करायचे आहे असे सांगत त्याने परवानगी घेतली होती असं बालगंधर्वच्या व्यवस्थापनाच म्हणनय . अक्षय माळी यानेही आपण फक्त फोटो एक्झीबीशन या नावानेच परवानगी मागीतली होती असं मान्य केलय.  अक्षय माळीने पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेतुन फोटोग्राफी एन्ड व्हिजुअल्स आर्टमधे पदवी घेतली असुन हे त्याचे पहिलेच एक्झीबीशन होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola