Pune Graduate Constituency Election | चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला : अरुण लाड

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola