Pune : अजित पवारांचे पोस्टर काढण्याची राष्ट्रवादी नगरसेवकावर वेळ
ज्यांना आदर्श मानतो, त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच फ्लेक्स काढण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर आलीय. पुण्यातील कात्रज आणि धनकवडी परिसरात अजित पवारांचे हातात तलवार घेतलेले आणि 'समझदार को इशारा काफी है', असं वाक्य लिहिलेले फ्लेक्स पुण्यात चर्चेचा विषय बनलाय. अजित पवारांशी संबंधित गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या फ्लेक्सकडे पाहिलं जात होतं. पण राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानंच या फ्लेक्सची दखल घेऊन नगरसेवक युवराज बेलदरेंना हे फ्लेक्स काढून टाकायला सांगितलं आहे.