Pune : शंभराव्या नाट्य संमलनावरून राजकारण, Ajit Pawarआणि नाट्य संमेलन आयोजकांची प्रतिक्रियाABP Majha

Continues below advertisement

Pune : शंभराव्या नाट्य संमलनावरून राजकारण, Ajit Pawarआणि नाट्य संमेलन आयोजकांची प्रतिक्रियाABP Majha
शंभराव्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज संध्याकाळी पाच वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात पार पडतोय.  या सोहळ्यास शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहतील अस आयोजकांकडून सांगण्यात आलय आणि कार्यक्रम पत्रिकेत दोघांची नावे देखील आहेत.  मात्र अजित पवारांनी या सोहळ्याचे आपल्याला आमंत्रणच नसल्याचा दावा केलाय.  मात्र नाट्य संमेलनाचे मुख्य आयोजक असलेल्या नाट्य निर्माते मेघराज राजे भोसले यांनी आपण वैयक्तिकरित्या भेटून अजित पवारांना या सोहळ्याचे आमंत्रण दिल्याच म्हटलय.  एवढंच नाही तर हे आमंत्रण देताना मंत्री उदय सामंत देखील आपल्यासोबत होते हे मेघराज राजे भोसले यांनी स्पष्ट केलय.  त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र स्टेज शेअर करण टाळत असल्याच स्पष्ट झालंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram