Pune : मुळशीच्या वळणे गावाजवळचा रस्ता वाहून गेला; डोंगर पोखरणाऱ्या 'उंदरांची' पोलखोल

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात माळीण दुर्घटना झाली.  डोंगर कोसळून शेकडो जीव गेले. यंदाही रायगडच्या तळीयेत त्याचीच पुनरावृत्ती झाली. पण या घटनांमधून आपण काही शिकणार आहोत की नाही? हे असं विचारण्याचं कारण म्हणजे... डोंगरभागात सुरु असलेली बेसुमार वृक्षतोड, खाणकाम आणि अनधिकृत बांधकामं..आणि त्याच्यावर कुणाचंही नसलेलं नियंत्रण. याच डोंगर पोखरणाऱ्यांची आता एबीपी माझा पोलखोल करणार आहे.

बातमी आहे पुणे जिल्ह्यातून. मुळशी तालुक्यातल्या वळणे गावाजवळच्या रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. वृश्रतोड, अनधिकृत बांधकामं आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्य़ानं रस्त्यावर तब्बल ३५ ते ४० फुटांचा खड्डा पडलाय. मुळशी तालुक्यातल्या वेळणे-कुंभेरी मार्गे लोणावळ्याला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. मात्र डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं हा रस्ता खचून मोठा खड्डा पडलाय. जवळपास २० ते २५ गावांचा संपर्क यामुळं तुटलाय. एखाद्या गावकऱ्याला वैद्यकीय उपचारांची गरज पडली तर त्याला कसं न्यायचं असा प्रश्न सध्या गावकऱ्यांसमोर आहे. मुळशी तालुक्यातल्या वळणे गावाजवळ डोंगर पोखरल्यामुळं, अनधिकृत बांधकामांमुळं आणि डोंगरावरुन वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळं काय परिस्थिती झालीय..पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola