Pune Money Laundering : बांधकाम व्यवसायिक Avinash Bhonsale यांची 4 कोटींची संपत्ती ED कडून जप्त
Continues below advertisement
पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बिल्डर अविनाश भोसले यांची 4 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. अविनाश भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारती बांधली असल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. भोसले हे महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.
Continues below advertisement