Pune Rain Updates : पुण्यात मोठ्या कालावधीनंतर पुण्यात पुन्हा पावसाची रिपरिप
Pune Rain Updates : पुण्यात मोठ्या कालावधीनंतर पुण्यात पुन्हा पावसाची रिपरिप
पुणे, लोणावळा भागात पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय. मध्यरात्रीपासून इथं पावसाने मुसळधार हजेरी लावलीये. तब्बल शंभर मिलिमीटर पाऊस झालाय. गेली तीन आठवडे या पावसाची प्रतीक्षा स्थानिक व्यावसायिकांना होती. आता पुन्हा एकदा पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येतील अन् त्याचा व्यवसाय तेजीत येईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७७७ मिलीमीटर पाऊस कमी झालाय. गेल्यावर्षी या काळात ४५८३ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली होती.
Tags :
Pune