Pune MNS Rada : 10वी परीक्षांच्या तोंडावर शाळेकडून छळ? मनसेकडून JSPM शाळेत तोडफोड
पुण्यातील वाघोली भागात एका शाळेमध्ये मनसेनं तोडफोड केली. जेएसपीएम शाळेत हा प्रकार घडला आहे. दहावीची परीक्षा तोंडावर आलेली असताना जेएसपीएम शाळा थकीत फीसाठी काही पालकांचा मानसिक छळ करतंय, असा आरोप मनसेनं केला आहे. कोरोनाकाळात थकलेल्या फीसाठी शाळा काही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट नाकारत आहे असा आरोप देखील मनसेनं केला आहे.