Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
पुणे पोलीसांचा गुन्हेगारांना धाक उरलाय का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. कारण दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आलीय.  समीर रॉय चौधरी असं हत्या झालेल्या ७७ वर्षीय जेष्ठ नागरीकाच नाव असून ते टाटा कंपनीतुन सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी पहाटे ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेलं चार जणांच टोळकं बाहेर पडलं होतं. या टोळक्याला आणखी दारू आणि त्यासाठी हवी होती. त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले. दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामधे समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असुन मागील आठवड्यातच जुवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरिक्षण गृहातुन जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातुन घडणाऱ्या गुन्यांना रोखण्याच कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झालय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola