Pune Metro : पुण्याच्या भुयारी मेट्रोच्या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण ABP Majha
पुण्यातील भुयारी मेट्रोच्या दोन्ही बोगद्यांचं काम अखेर पूर्ण झालंय. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पातील प्रत्येकी ६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गांचे काम काल पूर्ण झालं. येत्या ९ महिन्यांत कसबा पेठ स्थानकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे.
पिंपरी चिंचवड - स्वारगेट मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे ६ किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. रेंजहिल्सजवळून मेट्रो भुयारी मार्गात प्रवेश करेल आणि स्वारगेटला पोहोचेल. त्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम काल पूर्ण झालं. शिवाजीनगर ते कसबा पेठ आणि स्वारगेट ते कसबा पेठ हे दोन्ही बोगदे परस्परांना जोडले गेले. टाटा- गुलेरमार्ग कंपनीकडून या दोन्ही बोगद्यांचे आणि स्थानकांचे काम अद्याप सुरू आहे. ५ सप्टेंबर २०२१मध्ये या कामाला सुरुवात झाली होेती. आता हे काम पूर्ण झाल्यावर कामगारांनी तिरंग्यासोबत फोटो घेत काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.