Pune Metro Shashikant Limaye Death : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचं हृदयविकाराने निधन

Continues below advertisement

‘पुण्याचे मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेले शशिकांत लिमये यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालंय. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलंय. २०१४ मध्ये महामेट्रोने त्यांची पुणे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यातही लिमये यांची महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई आयआयटीमधून लिमये यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत नोकरीला लागले. कोकण रेल्वेसह विविध भागात त्यांनी जबाबदारी पार पाडल्यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही ते सक्रिय होते. तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram