Pune Metro : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं (Pune Metro) काम पूर्ण होऊनही अनेक कारणांमुळे या मेट्रो मार्गाचं उद्घाटन रखडलं होतं. त्यातच सगळी मार्गिका तयार असूनही मेट्रो मार्ग का सुरु करत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर अखेर पुणे मेट्रोच्या नव्या मार्गीकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रोमार्गाचे उद्घाटन होणार आहे.