Megha Kulkarni | माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात दारुड्यांचा हल्ला
सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.