मुंबईला एक न्याय, पुण्याला वेगळा न्याय का? पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांची नाराजी ABPMajha

Continues below advertisement

आजपासून मुंबईकरांना दिलासा मिळालाय तर पुणेकरांच्या पदरी निराशाच आलीय. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 1 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने ब्रेक द चेनअंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केलीय. यानुसार मुंबईत आजपासून आठवड्याचे सातही दिवस दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, मॉल्सबाबत पालिकेच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचवेळी लोकलची दारे सर्वांसाठी खुली होणार की नाही, याबाबतही आदेशात काहीच उल्लेख नाही. दुसरीकडे पुण्यात तिसऱ्या गटातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आलेत. पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्के असतानाही दिलासा का नाही? असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram