Pune Lockdown Update | जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी भुसार मार्केट सुरू करण्याचा निर्णय
नियम-अटींचे पालन करून पुण्याच्या मार्केटयार्डमधील भुसार विभाग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मार्केटयार्ड प्रशासकांनी दिली आहे. मार्केटयार्ड मधील आठ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भुसार विभाग अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा विभाग जीवनावश्यक गरजेत येत असल्याने, भुसार विभाग पुन्हा सुरु होणार आहे.