Pune Market yard Fire : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एका गोडाऊनला भीषण आग
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री एका गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असल्यानं आगीनं रौद्र रुप धारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानानांना आगीची माहिती मिळताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केेले. मात्र ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. मात्र अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.