Pune Maratha Protest : मराठ्यांचा रोष पुण्यापर्यंत, नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली

 मराठा आंदोलनाची धग (Maratha Reservation Protestआता पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आदोलकांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे.  मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे.  मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola