Lockdown 2 | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये शुकशुकाट
Continues below advertisement
ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या उद्योगांना आजपासून सुरु करण्यास अंशत: परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमधले निर्बंध मात्र कायम आहेत. असं असलं तरी राज्यातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आजपासून 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एकही कंपनी आज सुरु झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्याही आज बंदच राहिल्या. या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये मोडत असल्याने या शहरांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आयटी उद्योग पुढील काही दिवस बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे.
Continues below advertisement
Tags :
Hinjwadi IT Park IT Sector Pune IT Park Lockdown 2 Pune Corona News Lockdown Pune News Corona Virus Coronavirus