Unlock 1.0 | नियम आणि अटींसह तुळशीबागेतील दुकानं आजपासून सुरु
पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग अखेर आजपासून सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या नियमानुसार सकाळी दहा वाजता तुळशीबागमधील दुकानं उघडली. पुणे महापालिकेकडून तुळशीबागमधील व्यावसायिकांना पी1, पी2 च्या धर्तीवर दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज (5 जून) पी1 बाजूची दुकानं उघडण्यात येतील. सुरुवातीला 50 दुकानं आणि 50 स्टॉल उघडण्याचा प्रस्ताव होता. पण आता पी1 बाजूची सगळी दुकानं उघडण्याची परवानगी मिळाली आहे.