Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान

Continues below advertisement

पुणे : मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर पुण्यातही (Pune) होर्डींग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे. त्यातच, आज आणखी एक होर्डींग कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे. राज्यातील काही भागात आज पुन्हा मुसळधार (Rain) पाऊस पडला असून विदर्भातील अकोला, कोकणातील सिंधुदुर्गातही पावसाने हजेरी लावली होती. सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे.  

पुणे सोलापूर रोडवरील गुलमोहर लॉन्स येथे ही घटना घडली असून टोलनाक्या शेजारी उभारलेलं मोठं होर्डिंग मुसळधार पावसामुळे कोसळलं आहे. या होर्डिंगशेजारी बँड पथक उभे होते, अचानक वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात हे होर्डींग बँड पथकावर पडल्यामुळे बँड पथकाचे नुकसान झाले आहे. तर, बँड पथकातील होर्डींगखाली अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बँड पथकातील लोकांनी तत्काळ घोड्याला बॅनरखालून बाहेर काढले आहे, सध्या घोड्यावर उपचार करण्यात येत आहे. 

पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका इथे लग्नाची मिरवणूक सुरु होण्याआधी मंगल कार्यालयाजवळील होर्डींग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली कोसळले. त्यामधे नवरदेवासाठी आणलेला घोडा गंभीर जखमी झाला असून बॅड पथकाच्या गाडीसह इतर वाहनांचेही नुकसान झालं आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर  गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळून हा प्रकार घडला. त्यामधे दुचाकी, चार चाकीसह बँड वादकांच्या गाडीचेही नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram