Pune Lockdown | पुणे शहरात अनेक ठिकाणी रस्ते बंद, पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर चोख बंदोबस्त
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे .आणि आज या लॉकडाऊन चा दुसरा दिवस आहे. खरं तर या लॉकडाऊन साठी पुणे शहरातील अनेक रस्ते बांबू ,बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त देखील तैनात केला आहे. पुणेकरांनी या लॉकडाऊन ला उत्तम असा प्रतिसाद दिलाय. पुण्यातील शिवाजी रस्ता जो पुण्यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे पुण्याची मोठी मार्केट देखील याच रस्त्यावर आहे नेहमी या रस्त्यावर लोकांची वर्दळ असते परंतु या मुख्य रस्त्याला जोडले जाणारे उप रस्ते सगळे बांबू ,बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेत.जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता यासारख्या पुण्यातील मुख्य रस्त्यांवर येणारे उपरस्ते देखील बांबू बांधून बंद करण्यात आलेत.