Pune Kasba Chinchwad Bypoll Election : कसबा ,चिंचवडमध्ये कुणाची बाजी, कुणाची हार? : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेला एक महिना राज्यात दोन विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. चिंचवड आणि कबसा पेठ.. या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. आणि त्याचा निकाल अवघ्या काही तासांवर आलाय. पण, त्याआधी अनेक स्थानिक संस्थांनी या दोन्ही ठिकाणांच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आणले आहेत. एबीपी माझानं असा कोणताही एक्झिट पोल केलेला नाही. पण स्थानिक संस्थांनी एक्झिट पोल केला आणि हाच एक्झिट पोल आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. कारण चिंचवड आणि कसबा पेठ या दोन्ही ठिकाणी कोणाचा विजय होतोय, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कारण यासाठी राज्यातल्या सगळ्याच बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलीय. या दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार होते, त्यामुळे भाजपनं दोन्ही जागा राखण्यासाठी जोर लावलाय. तर मविआकडूनही जोरदार ताकद लावलीय.. राज्यातल्या सगळ्याच नेत्यांनी दिवसरात्र प्रचार केला. त्यामुळे नेमकं कोण बाजी मारतंय, याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. तोच निकाल काही तासांवर असतानाच, त्याची चुरस आणखी वाढवण्य़ासाठी आम्ही काही संस्थांचे एक्झिट पोल तुमच्यासमोऱ घेवून आलोय..