प्रशासनाकडून उत्तम सोय! पुण्याच्या कमला नेहरू लसीकरण केंद्रावर पुणेकरांच्या सकारात्मक प्रतिक्रिया
Covid Vaccination : देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे. देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचे सूत्रांकडून कळले आहे.