Pune Crime : पुणे जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या कबड्डीपटूची निर्घृण हत्या : ABP Majha
पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या झाल्याचे वृत्त आहे. धारदार कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.