Pune Jumbo Covid Center | पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा, बडा घर पोकळ वासा | स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टर ही उपलब्ध नाहीत, अशा परिस्थितीत 25 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. याच जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता. पुण्यातील covid-19 ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल 80 कोटीहून अधिक खर्च आला आहे. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झालाय. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram