Pune Corona | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर; वाढत्या प्रादुर्भावाला कोण जबाबदार?
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या (ॲक्टिव्ह केसेस) रुग्णसंख्येमध्ये आता पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. तर ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आणि मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या पुण्यात 36 हजार 810 ॲक्टिव्ह केसेस आहेत, ठाण्यात 36 हजार 219 ॲक्टिव्ह केसेस तर मुंबईत 23 हजार 704 अॅक्टिव्ह केसेस आहेत.