Pune International Marathon | रन पुणे रन, 34व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन | ABP Majha
३४व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला पुण्यातील सणस क्रीडांगणापासून सुरूवात झालीय. सकाळी सकाळी मोठ्या संख्येनं धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. जवळपास २० हजार धावपटू पुणे मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणार आहेत. तसंच शंभर परदेशी धावपटूंचाही यांत समावेश असेल. यंदा या मॅरेथॉनचा मार्ग बदलण्यात आलाय. धावपटू सिंहगड रोडमार्गे नांदेड सिटी येथे जातील आणि तेथून पुन्हा त्याच मार्गे सणस क्रीडांगणावर शर्यतीचा समारोप होणार आहे.