Pune Helicopter Crash : मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे:  पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, यामधून कोण प्रवास करत होतं याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये किती प्रवासी यामध्ये होते, त्याची देखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे. पौड जवशच असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच तीन सहकारी असल्याची माहिती आहे, ते यामध्ये जखमी झाले आहेत. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola