Elgar Parishad प्रकरणाचा तपास एनआयए करणार का? | ABP Majha
एल्गार प्रकरणातील तपासाची कागदपत्रे आणि आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी एनआयएने केलेल्या अर्जावर पुणे न्यायालय आज निकाल देणार आहे. एल्गार प्रकरणाच्या तपासाशी संबंधित कागदपत्रं पुणे पोलिसांनी एनआयएला देण्यास न दिल्यानं एनआयएनं पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली. या अर्जामध्ये हा खटला मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हलवण्याची मागणी केली आहे. तरी, आजच्या निकालातून एनआयएच्या मागणीसोबतच एल्गार प्रकरणाचा तपास नेमका कोण करणार याचाही फैसला होण्याची शक्यता आहे.