Pune Gold Market : सोन्याचा दर काहीसा कमी झाल्यामुळे सोनं खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
पुण्यात आज पाडव्या निमित्त सराफा बाजार फुलला आहे. धनतेरस, लक्ष्मी पूजन, आणि पाडवा या तीनही दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणत सोने खरेदी केली जात आहे. सोन्याचा दर काहीसा कमी झाल्यामुळे लोकांमध्ये खरेदीसाठी उत्साह पाहायला मिळतोय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी..