PUNE : पुण्यात संचारबंदीऐनजी जमावबंदी ठेवा, गिरीश बापट यांची मागणी,तर PMPML सेवा बंद ठेवण्याला विरोध
Pune Corona Lockdown: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सगळी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.