Corona Vaccine | केंद्राकडून कोरोना लसींच्या बाबतीत पुण्याला स्पेशल ट्रिटमेंट?

Pune Corona Vaccine:  केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना (Corona) लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्याचा अधिक लसींची गरज आहे, यात कुणाचंही दुमत नाही. पण, त्यातच मुंबई आणि इतर शहरांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना लस पुरवठ्याच्या बाबतीत पुण्याला प्राधान्य देत केंद्रानं दुजाभाव केला आहे का, असा सवाल महापौर मोहोळ यांच्या ट्विटर पोस्टनंतर उपस्थित केला गेला. 

दरम्यान, शुक्रवारी रात्री मुंबईसाठी 99 हजार कोरोना लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले. लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आता दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा मुबंईला उपलब्ध झाला आहे. 

एबीपी माझानं लसीकरण केंद्रावरुन घेतलेल्या आढ्याव्यानंतर आता मुंबईत कोविशील्ड लसीचे डोस पोहोचल्याची माहिती आहे. असं असलं तरीही हा पुरवठा पुढील दोन दिवस पुरेल इतकाच आहे. सध्या मुंबईमध्ये दिवसाला जवळपास 50 हजार नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. त्यामुळं लसीचा तुटवडा हा पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola