Pune Garbage | सहा दिवसांपासून पुणेकरांची कचराकोंडी कायम | ABP Majha
पुणेकरांना पुन्हा एकदा कचराकोंडीचा सामना करावा लागतोय. उरळी आणि फुरसुंगीकरांनी कचरा टाकू देण्यास मनाई केलीय. त्यामुळं गेल्या पाच दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळं अनेक सोसायट्यांमध्ये कचरा तसाच पडून आहे. कचरा डेपोमुळं होणारं प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे आजार आणि डासांची पैदास यामुळं उरळी आणि फुरसुंगीकर हैराण आहेत. दरम्यान, पालिका प्रशासननं ग्रामस्थांकडे १० एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे.