Pune Laser Light Issue : 'लेझर लाईट'मुळे दृष्टी झाली अधू, गणेश विसर्जन मिरवणुकीत घडला प्रकार

मिरवणुकांमध्ये लावण्यात येणारे लेझर लाईट्स डोळ्यांसाठी किती धोक्याचे आहेत हे पुण्यातील एका घटनेमुळे अधोरेखित झालंय. अनिकेत शिगवण या 23 वर्षाच्या तरुणाच्या डोळ्यांवर काही सेकंदासाठी लेझरचा झोत पडला आणि त्याच्या एका डोळ्याची दृष्टी कमी झाली.. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत..मात्र त्याची दृष्टी पूर्वीसारखी होणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.. त्यामुळे लेझर किती धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola