Pune Ganpati Visarjan Controversy: पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीवरून वाद, काय आहे प्रकरण?
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद न्यायालयात पोहोचलाय.... पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर ६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.