Pune Ganpati Bappa :पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वादावर मुंबई हायकोर्टात 6 सप्टेंबरला सुनावणी
Continues below advertisement
पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वादावर मुंबई हायकोर्टात आता सोमवारी ६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त पुढचे सलग पाच दिवस हायकोर्टाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होईल. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीआधी छोट्या गणपती मंडळांना विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.. पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती जातात... सव्वाशे वर्षापूर्वी जेव्हा गणेशोत्सवाला सुरुवात झाली तेव्हाच आधी विसर्जन कुणी करायचे या वादाला सुरुवात झाली.. अगदी हाणामारीपर्यंत हा वाद पोहोचला. त्यावेळी लोकमान्य टिळकांना हस्तक्षेप करावा लागला होता
Continues below advertisement